Posts

Showing posts from December, 2021

10 उपयुक्त औषधी वनस्पति

Image
  उत्तम आरोग्यासाठी १०  उपयुक्त औषधी वनस्पति  भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा उपयोग आरोग्याच्या तक्रारींसाठी करण्यात आलेला आहे. अशाच काही महत्वाच्या वनस्पतींची माहिती आज करून घेऊया.  १ ) तुळस -  आपल्याकडे तुळस ही पवित्र मानली जाते. तुळस घरातली हवा शुद्ध राखते. त्यामुळे घरात एक तरी तुळशीचे रोप असावे. सर्दी, ताप आणि अपचनाच्या तक्रारींवर तुळस हा एक रामबाण उपाय आहे.  अ‍ॅसिडिटीचा  त्रास होत असल्यास तुळशीची ४-५ पाने चावून खावीत त्याने लगेच आराम पडतो. पोट दुखत असेल तर तुळशीचा रस थोडा लिंबाचा रस घालून घ्यावा म्हणजे दुखणे थांबते. तुळशीचे  बी शरीरातील उष्णता कमी करते.  २) गवती चहा -                           गवतीचहाला संस्कृत मध्ये सुगंध तृण असे म्हणतात. गवतीचहाच्या काढयामुळे सर्दी खोकला कमी होतो व घाम येऊन ताप उतरायला मदत होते. हा काढा मूत्रल म्हणजे लघवी साफ करणारा आहे. अपस्मार, पोटातील वात तसेच त्वचा विका...